Jammu and Kashmir: शोपियान येथे चकमकीत सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा; एकाने केलं आत्मसमर्पण
Terrorists (PC - ANI)

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशत निर्मूलनाचे काम सुरू आहे. दररोज, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दरीत लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी शोपियात सुरक्षा दलाने तीन अतिरेकी ठार मारले. याशिवाय अलीकडेचं भरती झालेल्या एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले असून याठिकाणी सध्या शोध मोहीम सुरू आहे. आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्याचे नाव तौसिफ अहमद असं असल्याचं सांगितले जात आहे.

जम्मू काश्मीर पोलिसांनी ट्वीटद्वारे यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी ट्विट केले आहे की, "अल बद्र दहशतवादी संघटनेचे नव्याने भरती केलेले चार स्थानिक दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या शोपियानमधील कनिगाममध्ये अडकले आहेत. त्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी पोलिस आणि सुरक्षा दल सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत." (वाचा -Adar Poonawalla Z Plus Security: अदर पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबियांना झेड प्लस संरक्षण देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल)

दुसर्‍या ट्वीटमध्ये पोलिसांनी सांगितलं आहे की, "आत्मसमर्पण प्रस्ताव नाकारतांना अडकलेल्या अतिरेक्यांनी संयुक्त सर्च पार्टीवर गोळीबार केला आणि ग्रेनेड टाकला. त्यानंतर तीन दहशतवादी ठार झाले.