Coronavirus Pandemic in India: इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. आयएमएच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान आतापर्यंत 269 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. आयएमएने सर्व राज्यांसाठी डेटा जारी केला आहे. तथापि, दुसर्या लाटेत डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची संख्या पहिल्या लहरीपेक्षा कमी आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान, 748 डॉक्टरांचा मृत्यू झाला होता.
आयएमएने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बिहार राज्याने देशात सर्वाधिक डॉक्टर गमावले आहेत. बिहारमधील एकूण 78 डॉक्टर दुसर्या लाटेचे बळी ठरले आहेत. यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशात कोरोनाच्या दुसर्या लाटेत दरम्यान 37 डॉक्टरांनी आपले प्राण गमावले आहेत. (वाचा - Dr KK Aggarwal Passes Away: IMA चे माजी अध्यक्ष डॉ केके अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन)
त्यानंतर दुसर्या लाटेत दिल्लीतील 28 डॉक्टरांचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशात 22 डॉक्टरांचा मृत्यू झाला. तसेच, कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात 14 डॉक्टरांचा दुसर्या लाटेत बळी गेला.
आयएमएचे माजी अध्यक्षांचे निधन
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे सोमवारी रात्री साडेअकरा वाजता कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले होते. तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
गेल्या 24 तासांत 4329 रुग्णांचा मृत्यू
कोरोनामधून रोज होणार्या मृत्यूने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. गेल्या 24 तासात या धोकादायक विषाणूमुळे देशात 4329 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे संक्रमित प्रकरणांमध्ये घट दिसून आली आहे. त्याचबरोबर दररोज वाढत्या मृत्यूच्या आकडेवारीमुळे आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.