Baramulla Encounter: बारामुल्लामध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार; एक पोलीस कर्मचारी जखमी
Baramulla Encounter (PC - PTI)

Baramulla Encounter: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मधील बारामुल्ला (Baramulla) येथे बुधवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी (Terrorists) ठार झाले, तर एक पोलीस अधिकारी जखमी झाला. बारामुल्लाच्या सोपोर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सोपोरमधील हदीपोरा येथे दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले, ज्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

हदीपोरा येथे दहशतवादी लपल्याच्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी सकाळपासून शोध मोहीम सुरू केली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. यानंतर दोघांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. त्याचवेळी एक सुरक्षा कर्मचारीही जखमी झाला. (हेही वाचा -Bomb Blast Threat: देशातील Patna, Jaipur, Coimbatore, Vadodara यांसारख्या अनेक विमानतळांना बॉम्बची धमकी; कडक सुरक्षा उपाय लागू)

पहा व्हिडिओ - 

सोमवारी केंद्रशासित प्रदेशातील बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी रविवारी रात्री जिल्ह्यातील अरगाम भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली.