शनिवारी रात्री उशिरा बिहारच्या (Bihar) रोहतास (Rohtas) जिल्ह्यातील कोटा (Kota) गावात एका 18 वर्षीय तरुणीचा गोळीबारात (Firing) मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. चांदनी कुमार ही नर्तक असून ती नरेंद्र उर्फ मुन्ना महतोच्या टिळक समारंभात परफॉर्म करण्यासाठी गेली होती.
पोलिसांनी सांगितले की, तरुणी स्टेजवर नाचत असताना उत्सवादरम्यान हवेत अनेक राऊंड फायर करण्यात आले आणि एक गोळी मुलीला लागली. या घटनेनंतर कार्यक्रम थांबवण्यात आला. घटनास्थळी दाखल झालेल्या दरीगाव पोलीस आणि मुलीच्या कुटुंबीयांनी जखमी मुलीला सासाराम येथील सदर रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक (एसपी) विनीत कुमार यांनी सांगितले की, त्यांनी मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे घटनेनंतर कथितपणे फरार झालेल्या आशिष उर्फ पिंटूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शोध सुरू आहेत. हेही वाचा Bihar Shooting Incident: बिहार मध्ये दिवसाढवळ्या गोळीबार करत एकाची हत्या
6 मार्च रोजी, कैमूरमधील जगेबाराव गावात नृत्य कार्यक्रमादरम्यान एका मद्यधुंद व्यक्तीने अनेक राऊंड गोळीबार केल्याने एक तरुण ठार झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला. गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर रोजी रोहतासमधील कडवा गावात एका लग्न समारंभात झालेल्या गोळीबारात एका व्हिडिओग्राफरचा गोळ्या झाडून मृत्यू झाला होता.