Gujarat Morbi Cable Bridge Collapse: गुजरातमधील मोरबी (Morbi) जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी 6.30 वाजता मच्छू नदीवरील केबल पूल (Cable Bridge) कोसळला. अपघाताच्या वेळी पुलावर 300 हून अधिक लोक उपस्थित होते. 233 मीटर लांबीचा हा पूल सुमारे शंभर वर्षे जुना होता. या अपघातात 132 जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, राज्य सरकारचे मंत्री ब्रजेश मेरजा यांनी 60 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. ज्यात बहुतेक महिला आणि मुले आहेत. सुमारे 50 लोक बेपत्ता असून सुमारे 170 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींचे जबाबही समोर आले आहेत.
राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सोमवारी सकाळी सांगितले की, या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून आयजीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. (हेही वाचा -International Dyslexia Awareness Month चं औचित्य साधत दिल्लीत Rashtrapati Bhawan, North Block, South Block, India Gate वर लाल रंगाची रोषणाई (पहा फोटोज))
सर्वजण रात्रभर मदतकार्यात गुंतल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर नौदल, एनडीआरएफ, हवाई दल आणि लष्कराचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. रात्रभर 200 हून अधिक जवान शोध आणि मदतकार्यात गुंतले होते. खुद्द गृहमंत्री अमित शाह मोरबी दुर्घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. रात्रभर ते पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात होते. गुजरातचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनीही संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घटनेची सर्व माहिती देण्यात आली.
दरम्यान, गुजरातच्या सीओओने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाच्या 50 जवानांसह एनडीआरएफची 3 पथके, भारतीय वायुसेनेच्या 30 जवानांसह बचाव आणि मदत कार्यासाठी लष्कराच्या 2 तुकड्या आणि राजकोट, जामनगर, दीव आणि सुरेंद्रनगर येथून अत्याधुनिक उपकरणांसह अग्निशमन दलाची 7 पथके घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. या पथकांनी लोकांनी अनेकांची सुटकाही केली आहे.
#MorbiBridgeCollapse | Indian Army teams deployed in Morbi, Gujarat carried out search and rescue operations for survivors of the mishap. All three defence services have deployed their teams for search operations: Defence officials pic.twitter.com/tfEjCW3MhE
— ANI (@ANI) October 31, 2022
याशिवाय एसडीआरएफची 3 पथके आणि राज्य राखीव पोलिसांची 2 पथकेही बचाव आणि मदत कार्यासाठी मोरबीला पोहोचत आहेत. राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आयसोलेशन वॉर्डही बनवण्यात आला आहे. बचाव पथकाने आतापर्यंत 170 जणांना वाचवले आहे.