Potholes On Ram Path: मुसळधार पावसामुळे अयोध्येतील (Ayodhya) राम पथावर (Ram Path) अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. याचे खापर आता अधिकाऱ्यांवर फोडण्यात आलं आहे. रामपथावरील खड्ड्यांमुळे उत्तर प्रदेश सरकार (Government of Uttar Pradesh) ने सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि जल निगमच्या अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी सहा अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या भागातील नागरी कामासाठी जबाबदार असलेल्या गुजरातस्थित कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. रामपथच्या उभारणीसाठी 100 कोटींहून अधिक खर्च झाला. पहिल्याच पावसात रामपथवर 13 ठिकाणी खड्डे पडले आहेत.
निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पीडब्ल्यूडीचे तीन अधिकारी, कार्यकारी अभियंता ध्रुव अग्रवाल, सहायक अभियंता अनुज देशवाल आणि कनिष्ठ अभियंता प्रभात पांडे यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये मान्सून दाखल झाला असून अयोध्येतील राम पथावर खड्डे पडल्याने शहरातील पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. बांधकामाचा दर्जा निकृष्ट असणे हे रस्ते खचण्याचे प्रमुख कारण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (हेही वाचा -Ladakh Tragedy: लडाखमध्ये टँक सराव करताना मोठी दुर्घटना; नदी ओलांडताना पाण्याची पातळी वाढली, लष्कराच्या 5 जवानांचा मृत्यू)
अयोध्या: भारी बारिश के कारण अयोध्या में राम पथ पर कई गड्ढे हो गए। अब इसकी गाज अधिकारियों पर गिरी है। राम पथ धंसने की घटना के मद्देनजर, उत्तर प्रदेश सरकार ने लोक निर्माण विभाग (पीडब्ल्यूडी) और जल निगम के कई अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की है। गुजरात स्थित एक फर्म को नोटिस जारी pic.twitter.com/AoWwVU552I
— shivendra rai (@shivendra_4u) June 29, 2024
राज्य सरकारने या घटनेला दिलेल्या तत्पर प्रतिसादात अभियंत्यांना निलंबित केले आहे. तसेच नागरी कामात गुंतलेल्या गुजरातस्थित कंपनीच्या जबाबदाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या कंपनीला बांधकाम टप्प्यांदरम्यान दर्जा आणि दर्जाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. अयोध्येतील रामपथसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अशा घटनेमुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.