Accident Representational image (PC - PTI)

Gujarat Road Accident: गुजरातमधील सूरत येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात (Road Accident) झाला. येथे फूटपाथवर झोपलेल्या लोकांना ट्रकने चिरडले. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील सर्व बळी हे पेशाने मजूर असून ते राजस्थानचे आहेत.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात 8 लोक जखमी झाले असून त्यांना सुरतच्या स्मीयर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूरतच्या पालोद गावात हा अपघात झाला. सर्व कामगार फुटपाथवर झोपले असताना ऊस ट्रॅक्टर व ट्रक समोरासमोर आले आणि ट्रकचालकाचा डंपरवरील ताबा सुटला. हा ट्रक फुटपाथवर चढला. यात 13 मजूरांचा चिरडून मृत्यू झाला. (वाचा - Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील उमरिया येथे 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नराधमांनी सलग 4 दिवस केला सामूहिक बलात्कार)

या रस्ते अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी हीच प्रार्थना, मोदी यांनी म्हटलं आहे. या घटनेनंतर गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. सुरत पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.