BJP leader Mukul Roy (Photo Credits: IANS)

कर्नाटक (Karnataka) आणि गोवा (goa) नंतर आता भारतीय जनता पार्टी (BJP) ची नजर पश्चिम बंगाल (West Bengal) वर आहे. भाजप नेते मुकुल रॉय (Mukul Roy) यांनी शनिवारी कोलकाता येथे असा दावा केला आहे की, ज्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. मुकुल रॉय यांनी सांगितले की, 'पश्चिम बंगाल मधील सीपीएम, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे 107 आमदार बीजेपीमध्ये सामील होणार आहेत. आमच्याकडे अशा आमदारांची यादीदेखील तयार आहे आणि ते आमच्या संपर्कात आहेत.' 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील प्रभावशाली प्रदर्शनानंतर बीजेपी पश्चिम बंगालमध्ये आपले स्थान अजून मजबूत बनवण्याच्या प्रयत्नात आहे.

यावर्षी मे महिन्यामध्ये टीएमसी आणि सीपीएमचे आमदार व नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या 42 पैकी 18 जागा भाजपने मिळवल्या आहेत. त्याच आधारावर भाजप बंगालमध्ये आपले पाय मजबूत करत आहे. 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये 294 सदस्यीय विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला 211 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या. (हेही वाचा: भाजपच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिमांच्या नमाज विरोधात रस्त्यावर केले हनुमान चालीसा पठण (Watch Video))

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये प्रचाराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, तृणमूल काँग्रेसचे 40 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. बीजेपी ने आपले विचारक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त 6 जुलै पासून सदस्यता अभियान सुरू केले आहे. यादरम्यान, पश्चिम बंगालचे बीजेपी अध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले की, राज्यात पक्षाचे 42 लाखपेक्षा अधिक सदस्य आहेत. आता या सदस्यता अभियानाद्वारे ही संख्या कोटीच्या घरात जाण्याची अपेक्षा आहे.