पश्चिम बंगाल: भाजपच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिमांच्या नमाज विरोधात रस्त्यावर केले हनुमान चालीसा पठण (Watch Video)
OP Singh, President of BJP Youth Wingh of Howrah (Photo Credits: ANI)

पश्चिम बंगाल मध्ये सध्या तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील राजकीय वाद धार्मिक वळण घेऊ लागले आहे. मंगळवारी रात्री उशिरा भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हावडानजीक बाली खाल येथे रस्त्यावर उतरत हनुमान चालीसा पठण केले.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष ओम प्रकाश आणि प्रियंका शर्मा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भाजपच्या या हनुमान चालीसा पठणामुळे काही तास रस्ता पूर्णपणे बंद होता. यावर युवा मोर्चाचे अध्यक्ष ओमप्रकाश म्हणाले की, "रस्त्यावर नमाज पठण करु शकतात. तर मग हनुमान चालीसा पठण का करु शकत नाही? त्यानंतर आता हावडा येथे प्रत्येक मंगळवारी विविध ठिकाणी हनुमान चालीसा पठण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले."

ANI ट्विट:

 

शुक्रवारी नमाजासाठी अनेक रस्ते बंद असतात. त्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागतात. लोक ऑफिसमध्ये वेळेवर पोहचू शकत नाही. हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आम्ही मंगळवारी मुख्य रस्त्यांवरील हनुमान मंदिरांजवळ हनुमान चालीसा पठण करणार, असे भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.