Accident Representational image (PC - PTI)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये (Gwalior) आज मोठा अपघात झाला. जुन्या छावणीत (Purani Chhawan) बस आणि ऑटोची जोरदार टक्कर झाली. या अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला, ज्यात 12 महिला आणि ऑटो चालक यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविले आहेत.

बस आणि ऑटो दरम्यान टक्कर इतकी जोरदार होती की 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 महिला आणि एका ऑटो चालकाचा समावेश आहे. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस अधिकारी या अपघाताची चौकशी करत आहेत. (वाचा - Fact Check: ठाण्यातील Balkum येथे मेट्रो पिलर रस्त्यावरील वाहनांवर कोसळला? जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागील सत्य)

प्राथमिक माहितीनुसार, बस ग्वाल्हेरहून मुरैनाकडे जात होती. असे सांगितले जात आहे की, महिला 2 ऑटोमध्ये होत्या. परंतु एक ऑटो खराब झाल्यामुळे सर्व महिला दुसर्‍या ऑटोमध्ये बसल्या होत्या. त्यामुळे मृतांचा आकडा इतका वाढला. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, राज्य सरकार या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबांना प्रत्येकी चार लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देणार असल्यास शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं आहे.