Yuzvendra Chahal याची गर्लफ्रेंड Dhanashree Verma हिचा 'अफगान जलेबी' गाण्यावर हॉट डान्स; व्हिडिओ व्हायरल
Dhanashree Verma (Photo Credits: Instagram)

Dhanashree Verma Dance Video: भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची गर्लफ्रेंड धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. आपल्या नृत्य कौशल्याने तिने अधिक लोकप्रियता मिळवली आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या धनश्रीने अनेक व्हिडिओज शेअर करत असते. या व्हिडिओमध्ये ती घरात किंवा डान्स क्लासमध्ये आकर्षक अंदाजात नृत्य करताना दिसते. या व्हिडिओजना चाहत्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत असतो. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यात ती कैटरीना कैफ च्या 'अफगान जबेली' (Afghan Jalebi) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओत धनश्रीचा हॉट डान्स पाहायला मिळत आहे. यात तिने ब्लू ट्रॅक पॅन्ट आणि कलरफुल टॉप घातला आहे. धनश्रीच्या या डान्सवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Yuzvendra Chahal याची होणारी पत्नी Dhanashree Verma हिचा 'शरारा शरारा' गाण्यावर धमाकेदार डान्स, Watch Video)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

धनश्री च्या या व्हिडिओला खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. इंस्टाग्रामवर या व्हिडिओला 5 लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. धनश्री डेंटल सर्जन असून मुंबईच्या श्यामक डावर डान्स ट्रेनिंग इंस्टिट्यूट मधून डान्सचे प्रशिक्षण घेतले आहे. दरम्यान, 8 ऑगस्ट 2020 मध्ये धनश्रीचा युजवेंद्र चहल सोबत साखरपुडा झाला.