Yuzvendra Chahal याची होणारी पत्नी Dhanashree Verma हिचा 'शरारा शरारा' गाण्यावर धमाकेदार डान्स (Watch Video)
Dhanashree Verma (Photo Credits; Instagram)

Dhanshree Verma Dance Video: भारतीय क्रिकेट टीमचा (Indian Cricket Team) प्रसिद्ध लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची होणारी पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) अनेकदा आपल्या डान्सने लोकांचे मन जिंकत असते. धनश्री सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून ती आपले डान्सिंग व्हिडिओज शेअर करत असते. तिचे डान्स व्हिडिओज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतात आणि लोकांच्याही चांगलेच पसंतीस उतरतात. अलिकडेच धनश्रीने शेअर केलेला नवा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच हिट ठरत आहे. धनश्रीने शरारा शरारा गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. तिचा हा डान्सला चाहत्यांकडून वाहवा मिळत आहे.

शमिता शेट्टी हिच्या शरारा शरारा गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ धनश्रीने खूप पूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. ज्यात ती टी-शर्ट आणि ट्रॅक पॅट्स मध्ये धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. ('रासोडे में कौन था' रॅपवर युजवेंद्र चहल आणि मंगेतर धनश्री वर्माची मस्ती, तर क्रिस गेलं म्हणाला 'आता पुरे! मी रिपोर्ट करेन', Watch Video)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून धनश्रीच्या डान्सचे कौतुक होत आहे. धनश्री देखील नृत्यप्रेमींसाठी ट्युटोरियल व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असते. (युजवेन्द्र चहल लग्नबंधनात आकडकण्यासाठी तयार, मंगेतर धनश्री वर्मा सोबत साखरपुड्याचे फोटो व्हायरल; CSKने मजेदार अंदाजात दिल्या शुभेच्छा)

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

धनश्री डॉक्टर असून आपल्या डान्स व्हिडिओजमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. धनश्री आणि युजवेंद्र चहल यांचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. दरम्यान, अलिकडेच झालेल्या आयपीएल 2020 मध्ये युजवेंद्र ला चीयर करण्यासाठी धनश्री दुबईत देखील गेली होती.