लंडनमधील फेनेला फॉक्स नावाची मॉडेलने काख दाखवून $375,000 कमावले आहेत. 28 वर्षीय मॉडेल म्हणते की सुरवातीला टीका केल्याच्या निषेधार्थ काखेतले केस काढणे बंद केले. पुरुषांनी त्यांच्या काखेतले केस काढणे समाजाला मान्य आहे. मग महिलांकडून अशी अपेक्षा का करू नये? तिने एवढे पैसे कमावले असले तरी तिचे लैंगिक जीवन तितकेसे यशस्वी नाही. मॉडेल म्हणते की, काही पुरुषांनी तिच्या काखेतले केस वाढवण्याच्या तिच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तिने सांगितले की एका माणसाने तिचे कौतुक केले आणि तिचा निर्णय स्वीकारला.
दरम्यान, इतर अनेक पुरुषांनी तिला 'घृणास्पद', 'घाणेरडे' आणि 'अस्वच्छ' म्हटले आहे. तिने डेली मेलला सांगितले की, केस न काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या आहेत. ती म्हणाली, "काहींनी टिका करत म्हटले आहे की, मी नेहमीच अविवाहित राहीन" आणि "कधीच कोणता पुरुष मिळणार नाही". असे असूनही, फॉक्स म्हणते की, ती तिच्या केसाळ काखेसह आनंदी आहे. ती म्हणाली की, केस न काढल्याने तिला सेक्सी वाटते.
सार्वजनिक ठिकाणी हात वर केल्याने तिला "गर्व" वाटतो. महिला तिच्या केसाळ काखेचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत असते त्यामुळे ती प्रसिद्ध झाली आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती पैसे कमावते.