Photo Credit- X

Ram Gopal Varma: पुष्पा 2: द रुल प्रीमियर दरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी तेलगू सुपरस्टार ला (Allu Arjun) अटक करण्यात आली. आज सकाळी त्याची तुरुंगातून सुटका झाली. त्याच्या अटकेवर चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चार प्रश्न विचारले. (Allu Arjun's Fan Attempts Suicide : अल्लू अर्जुनच्या चाहत्याचा कारनामा; जेलमधून सुटकेसाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतले (Watch Video))

पुष्पा २ अभिनेता अल्लू अर्जुनचा बचाव करताना राम गोपाल वर्मा यांनी लिहिले की, "अल्लू अर्जुनच्या अटकेच्या प्रकरणात माझे संबंधित अधिकाऱ्यांना हे 4 प्रश्न आहेत - 1) कुंभमेळा किंवा ब्रह्मोस्तव सारख्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्यास, देवांना अटक केली जाईल का? 2) राजकीय सभा किंवा रॅलींमध्ये चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्यास राजकीय नेत्यांना अटक केली जाईल का? त्यांनी पुढे विचारले, ३) सार्वजनिक चित्रपट कार्यक्रमात चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्यास, नायक आणि नायिकांना अटक केली जाईल का? 4) पोलिस आणि आयोजकांशिवाय, चेंगराचेंगरीचे नियंत्रण कोण करू शकेल?" (Allu Arjun Released from Jail: संपूर्ण रात्र तुरुंगात घालवल्यानंतर अल्लू अर्जुनला सकाळी सुटका; वडील-सासरे आले घेण्यासाठी)

राम गोपाल वर्मा यांनी 9 डिसेंबर रोजी स्पष्ट केले होते की, चेंगराचेंगरीसाठी अल्लू अर्जुनला दोष देऊ नये. या घटनेत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा जखमी झाला. सेलिब्रेटींची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमते तेव्हा चेंगराचेंगरी होते, असे वर्मा यांनी म्हटले होते. हा अभिनेता कार्यक्रमस्थळी हजारो लोकांना आकर्षित करेल हे माहीत असेल तर पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिली नसती, असेही ते म्हणाले.

अशा स्पेशल शोवर बंदी घालू नये असेही ते म्हणाले. चेंगराचेंगरीत लोक मरण पावल्यानंतर राजकीय रॅली आणि बंदी का नाही?, असा सवालही त्यांनी केला.