Bad Newz Box Office Collection Day 3: विकी कौशल आणि तृप्ती डिमरी स्टारर 'बॅड न्यूज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पहिल्या वीकेंडमध्ये या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाने तीन दिवसांत 30.62 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने शुक्रवारी 8.62 कोटी रुपये, शनिवारी 10.55 कोटी रुपये आणि रविवारी 11.45 कोटी रुपये कमावले. म्हणजेच तीन दिवसांत चित्रपटाने एकूण 30.62 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या या शानदार सुरुवातीमुळे निर्माते खूप खूश आहेत. चित्रपटाची कथा एका अनोख्या विषयावर आधारित आहे. या चित्रपटातील विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. या चित्रपटाचे संगीतही लोकांना आवडत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे.
तीन दिवसांत ३० कोटींहून अधिकचा व्यवसाय:
View this post on Instagram