Mumbai: मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी सरकारवर टीका केल्याने भर कार्यक्रमात त्याचे भाषण थांबविण्यात आलाच्या संतप्त प्रकार शनिवारी घडला आहे. यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
मुंबई येथील 'नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट' (National Gallery of Modern Art) येथे सुप्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे (Prabhakar Barwe) यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना पालेकर यांनी सरकारच्या सांस्कृतिक आणि कालाविषयक आखलेल्या धोरणांवर टीका करण्यास सुरुवात केली. तसेच आर्ट गॅलरीने आपले स्वातंत्र्य कसे गमावले याबाबतही पालेकरांनी म्हटले.पालेकर यांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या एका सल्लागार समितीचा यावेळी उल्लेख केला. या समितीमध्ये स्थानिक कलाकारांचे प्रतिनिधित्व होते. परंतु आता या समितीला थेट संस्कृती मंत्रालयाच्या नियंत्रणांतर्गत आणले गेल्याचे पालेकरांनी कार्यक्रमात म्हटले.
This is so shocking, veteran actor Amol Palekar being disrupted, not allowed to speak. Veteran actor Palekar retorted: “Are you trying to stop me from speaking and applying censorship on my speech?” pic.twitter.com/m5IxmRr8In
— MumbaiCongress (@INCMumbai) February 9, 2019
तर आपले परखड मत मांडत असताना पालेकर यांना मंचावर उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या आयोजक आणि समन्वकांनी भाषणामध्येच अडथळा आणण्यास सुरुवात केली. तर विषयाला सोडून सरकारवर टीका करणे थांबवा असे ही त्यांना सांगण्यात आले. याबाबत 'द वायर' या वेबसाईटने वृत्त दिले आहे.