Lata Mangeshkar (Photo Credits: Getty)

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी या आजारातून वेगवेगळ्या वयोगटातले अनेक लोक बरे होत असल्याचं सांगितलं. हे ऐकून समाधान वाटलं. तसचं शिवछत्रपतींच्या या महाराष्ट्राने अनेक संकटाचा सामना केला आहे आणि मला खात्री आहे की, या संकटावरही महाराष्ट्र यशस्वीपणे मात करेल आणि तुमच्या नेतृत्वाखाली उतरोत्तर प्रगती करत राहील, अशी प्रतिक्रिया गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी दिली आहे.

लतादिदिंनी उद्धव ठाकरे आणि समस्त ठाकरे परिवार व त्यांचे सर्व सहकारी यांना महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छाही दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लतादिदिंनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी विश्वास व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर मात करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (हेही वाचा - फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडियाचे CEO कुलमीत मक्कड यांचे निधन)

दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी लता मंगेशकर यांनी गायलेल्या एका गाण्याची आठवण सांगितली. तसेच 3 मे नंतर मुंबई, पुणे वगळता इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये मोकळीक देणार असल्याचंही स्पष्ट केलं. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जाईल, परंतु, लोकांनी सोशल डिस्टिंक्शनचे पालन करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे, असंही स्पष्ट केलं आहे.