फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडियाचे (Film And Tv Producers Guild Of India) सीईओ कुलमीत मक्कड (Kulmeet Makkar) यांचे आज मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कुलमीत मक्कड हे 60 वर्षांचे होते. बॉलिवुड अभिनेता इरफान खान याचे बुधवारी निधन झाले. त्यानंतर लगेचचं दुसऱ्या दिवशी अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले. तसेच आज म्हणजेच शुक्रवारी कुलमीत मक्कड यांचे निधन झाले. त्यामुळे बॉलिवुडमध्ये शोककळा पसरली आहे. गेल्या तीन दिवसात बॉलिवुडमधील दिग्गजांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, कुलमीत मक्कड यांच्या निधनावर बॉलिवुडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे. दिग्दर्शक करण जोहर, अशोक पंडित, विद्या बालन, सुभाष घै, आदी कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कुलमीत मक्कड यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. (हेही वाचा - Rishi Kapoor Funeral: अभिनेते ऋषी कपूर पंचतत्वात विलीन; सैफ अली खान, करीना कपूरसह अनेकांनी उपस्थित राहून रणबीर कपूर, नीतू सिंह यांना दिला मानसिक आधार)
Kulmeet you were such an incredible pillar to all of us at the Producers Guild of India....relentlessly working for the industry and towards its enhancement and advancement... you left us too soon...We will miss you and always Remember you fondly.... Rest in peace my friend... pic.twitter.com/GUcapyjfMo
— Karan Johar (@karanjohar) May 1, 2020
करण जोहरने कुलमीत यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलंय की, ‘कुलमीत तुम्ही प्रोड्यूसर गिल्डचे एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ होतात. तुम्ही इंडस्ट्रीच्या चांगल्या विकासाठी सतत काम केले. तुम्ही खूप लवकर आम्हाला सोडून गेलात. तुम्ही कायम आमच्या आठवणीत राहाल.’