telugu television actress Bhargavi (Photo Credits: Twitter)

तेलगू अभिनेत्री अनुषा रेड्डी (21) (Anusha Reddy) आणि भार्गवी (20) (Bhargavi) यांचा बुधवारी (17 एप्रिल) कार अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अनुषा आणि भार्गवी 'मुत्याला मुग्गु' या टीव्ही शो मध्ये काम करत होत्या. बुधवारी दोघीही हैद्राबाद येथे आपले शूटिंग पूर्ण करुन परतत असताना अचानक कारला अपघात झाला आणि दोघींचाही जागीच मृत्यू झाला.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, हा अपघात बुधवारी विकाराबाद येथे झाला असून कार ड्रायव्हर वक्री चालवत होता. अचानक समोर आलेल्या ट्रकला साईड देण्यासाठी ड्रायव्हरने कार दुसऱ्या बाजूला वळवली आणि कार एका झाडावर आदळली. (लोकप्रिय तेलुगू अभिनेत्री Naga Jhansi ची आत्महत्या; बॉयफ्रेंडशी भांडण झाल्याने उचलले टोकाचे पाऊल)

माहितीनुसार, या कारमध्ये 4 लोक होते. त्यापैकी 2 अभिनेत्रींचा जागीच मृत्यू झाला. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हैद्राबाद येथील उस्मानिया जनरल हॉस्पिटल (Osmania General Hospital) मध्ये उपचार सुरु आहेत.

'मुत्याला मुग्गु' या टीव्ही शो मध्ये भार्गवी नेगेटीव्ही भूमिका साकारत होती. तर अनुष्का तेलंगणाची रहिवासी होती.