The Diplomat Trailer

The Diplomat Trailer: पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट 'द डिप्लोमॅट' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. शिवम नायर दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहम जेपी सिंह यांच्या भूमिकेत आहे, ज्यांनी पाकिस्तानातून उस्मा (सादिया खतीब) या भारतीय मुलीला परत आणले होते. 'द डिप्लोमॅट'मधील जॉन अब्राहमची व्यक्तिरेखा त्याच्या आधीच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. यावेळी ट्रेलरमध्ये राजकीय ड्रामा आणि भावनिक तीव्रतेचे उत्तम मिश्रण दाखवण्यात आले आहे. चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असून यात जॉन अब्राहमसोबत रेवती आणि कुमुद मिश्रा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. जॉनची व्यक्तिरेखा मुत्सद्दी डावपेचांचा मोठ्या प्रमाणात वापर करून अत्यंत नाजूक आणि धोकादायक परिस्थिती हाताळण्याचा कसा प्रयत्न करते, हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

पाहा 'द डिप्लोमॅट'चा ट्रेलर:

'द डिप्लोमॅट'मधील जॉन अब्राहमचे डायलॉग ्स आणि त्याचा इंटेन्स लूक चाहत्यांना खूप आवडत आहे. त्याला वेगळ्या अवतारात पाहण्याची इच्छा असलेल्या त्याच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट पर्वणी ठरू शकतो. हा चित्रपट 7 मार्च 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द डिप्लोमॅट'चा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली असून ते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.