डिलिव्हरी बॉयकडून मोबाईल क्रमांक अश्लील ग्रुप मध्ये टाकल्याचा तमिळ अभिनेत्री गायत्री साई हिचा धक्कादायक आरोप
गायत्री साईं (Photo Credits: IANS)

दिग्दर्शक मणिरत्न यांचा 1990 मध्ये आलेला चित्रपट 'अंजलि' मध्ये बालकलाकारच्या भुमिकेतून सुरुवात केलेल्या अभिनेत्री गायत्री साई (Gayatri Sai) हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने असे म्हटले आहे की, एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयने तिचा मोबाईल क्रमांक विविध अश्लील ग्रुपवर शेअर केल्याचा आरोप तिने लावला आहे. हे प्रकरण आता पोलिसात पोहचले असून तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती गायत्री साई हिने स्वत:हून दिली आहे. गायत्री हिने ट्वीट करत असे म्हटले आहे की, चेन्नईमधील डॉमिनोजच्या एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयने 9 फेब्रुवारीला माझा क्रमांक अश्लील ग्रुपमध्ये व्हॉट्सअॅपवर शेअर केला.

गायत्री हिने पिझ्झा डिलिव्हरी बॉयकडून क्रमांक अश्लील ग्रुपमध्ये टाकण्यात आल्याची तक्रार सुद्धा त्याच्या ऑफिसमध्ये केली. माझ्याकडे बहुसंख्य फोन आणि कॉल्स, व्हॉट्सअॅफ मेसेज असून त्यामध्ये माझ्या क्रमांक शेअर केला आहे. ट्वीटमध्ये गायत्री हिने एक व्हॉट्सअॅप चॅटसुद्धा शेअर केला आहे.(सलमान खान लवकरच साकारणार शिख पोलिसाची भूमिका; आयुष शर्मा गँगस्टर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला)

गुरुवारी गायत्री यांना सांगण्यात आले की चेन्नई पोलिसांच्या एडीजीपीने हे प्रकरण थेनेपेटमधील सर्व महिला पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे.