Nidhi Bhanushali Bikini Pics: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' टीव्ही मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली बिकनीतील 'या' फोटोमुळे चर्चेत
Nidhi Bhanushali (Photo Credit: Instagram)

तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. नुकत्याच गोव्यात झालेल्या सुट्टीतील निधीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. निधीने आपल्या इंस्टाग्राम अकांउटवर फोटो शेअर करत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये ती ब्लू कलरची बिकिनी परिधान करुन बीचवर शूट करत असल्याचे दिसत आहे. कोविड-19 पासून दूर राहता यावा म्हणून मी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी घेत आहे, असे कॅप्शनही तिने या फोटोला दिले आहे. निधीचा हा बोल्ड अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

तारक मेहता का उलटा चष्मा या टीव्ही मालिकेने मोठी सुप्रसिद्ध मिळवली आहे. या मालिकेला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत, परंतु तरीही प्रेक्षकांना ते पहायला आवडते. या मालिकेचे तब्बल 3 हजार भाग पूर्ण झाले आहेत. या मालिकेत निधी भानुशालीने जुन्या सोनूची भूमिका साकारली होती. तिने मालिका सोडला असली तरी सोशल मीडियावर ती खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. हे देखील वाचा- Amit Sadh: 'काई पो छे' स्टार अमित साध ने 4 वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न; मुलाखतीत मोठा खुलासा

निधी भानुशाली इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur)

तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत निधीने आत्माराम तुकाराम भिडे आणि माधवी यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. या मालिकेत ती प्रेक्षकांच्या पसंतील उतरली होती. 2013 ते 2019 पर्यंत या मालिकेत होती. दरम्यान, गेल्या वर्षी तिने या मालिकेमधून निरोप घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, निधी आता पूर्ण वेळ अभ्यासात घालवीत आहे. यामुळे तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.