सुष्मिता सेन हिच्या Miss India 1994 Winning Gown ची प्रेरणादायी कहाणी! कुण्या फॅशन डिझायनरने नव्हे तर गॅरेज मधील शिंप्याने शिवला होता 'हा' सुंदर ड्रेस (Watch Video)
Sushmita Sen Miss India Winning Gown (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिने मिस युनिव्हर्स (Miss Universe) स्पर्धा जिंकून भारताच्या शिरपेचात अभिमानास्पद तुरा रोवला होता, तो क्षण अजूनही सर्वांच्या लक्षात आहे. त्यापूर्वी मिस इंडिया 1994 च्या विजेतेपदावर सुद्धा तिने आपले नाव कोरले होते. या स्पर्धेतील एक खास आठवण तिने काही वर्षांपूर्वी एका शो मध्ये शेअर केली होती, या शो मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये सुष्मिताने आपल्या मिस इंडिया विनिंग गाऊनची (Miss India Winning Gown) स्टोरी शेअर केली आहे. ‘मिस इंडिया’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने परिधान केलेला ड्रेस हा कुण्या फॅशन डिझायनरने नव्हे तर त्यांच्या घराखाली राहणाऱ्या गॅरेज मधील शिंप्याने शिवला होता असे सुष्मिताने सांगितले आहे. या ड्रेससाठी महागडा डिझायनर परवडणे शक्य नसल्याने सुष्मिताच्या आईने सरोजिनी नगर मधून कापड आणून घराखालील शिंप्याकडून ड्रेस शिवून दिला घेतला होता. Miss Universe 2019: दक्षिण आफ्रिकेची सौंदर्यवती Zozibini Tunzi ने पटकावला ‘मिस युनिव्हर्स 2019’ चा किताब

सुष्मिता च्या मिस इंडिया विनिंग गाऊनची कहाणी

"मिस इंडियाच्या अंतिम राउंड साठी चार ड्रेस हवे होते, यावेळी डिझायनर कपडे घेण्यासाठी जमणार नव्हते, म्ह्णून आईने मार्केट मधून कापड आणून पेटीकोट शिवणाऱ्या शिंप्याकडे शिवायला दिले. या टेलरला केवळ हा ड्रेस टीव्हीवर दिसायचा आहे तेवढा चांगला बनवा असं सांगितलं होतं. जेव्हा ड्रेस शिवून झाला तेव्हा उरलेल्या कापडाचा आईने रोज बनवला होता, आणि नवे मोजे कापून त्याचे ग्लोव्ह्ज बनवले होते. या साऱ्यातून एक शिकवण मिळते की तुमचा हेतू चांगला असेल आणि तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर पैसे ही कधीच समस्या राहत नाही." असे सुष्मिताने या व्हिडीओ मध्ये म्हंटले होते.

पहा व्हिडीओ

सुष्मिता सेनने 1994 मध्ये जेव्हा ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती.   यांनतर पुढे 1994 मध्येच तिने मिस युनिव्हर्सची सुद्धा स्पर्धा जिंकली होती. याच वर्षी ऐश्वर्या राय हिने सुद्धा मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती.