सुश्मिता सेन बनली बॉडीबिल्डर; पाहा फोटो आणि व्हिडीओ
सुष्मिता सेन (Photo Credits: Instagram)

सुश्मिता सेनला बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. योगा, व्यायाम आणि संतुलित आहार हे तिच्या फिटनेसचे असलेले रहस्य ती नेहमीच सांगत आली आहे. सहसा अभिनेत्री झिरो फिगरसाठी जिमचा आधार घेतात. हा जिमचा ट्रेंड इतका लोकप्रिय ठरत आहे की, आजकाल मुलांसोबत मुलीही मेंटेन राहण्यासाठी जिमकडे वळतात. मात्र सुश्मिता सेन फक्त झिरो फिगरसाठीच नाही, तर तिचे मसल्स बिल्ड करायला जिमचा आधार घेताना दिसून येत आहे. होय चक्क एका बॉडीबिल्डर सारखे तयार झालेल्या तिच्या मसल्सचा फोटो नुकताच तिने सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. या फोटोवरूनच तुम्ही सुश्मिताच्या फिट फिगरचा आणि तिच्या मेहनतीचा अंदाज लावू शकता.

हा फोटो शेअर करताना सुश्मिता सेनने लिहिले आहे, ‘मोठा परिणाम दिसण्यासाठी तुम्हाला लहान लहान गोष्टींवर फोकस करणे गरजेचे आहे’

 

View this post on Instagram

 

Goooood Morning!!!! I love you guys, have an awesome day!!! #breathe #feel #aspire #inspire#tuesdaymotivation #love

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

सुश्मिता नेहमीच आपल्या वर्कआउटचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मिडियावर शेअर करत आलेली आहे. सुश्मिताचे हे व्हिडीओज लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.