Sunny Leone : सनी लियोनीने पुन्हा 'या' चित्रपटाची शुटींग केली सुरू, सोशल मीडियावरून दिली माहिती
सनी लिओनी (Photo Credit : Instagram)

कोरोनाच्या (Corona Virus) तिसर्‍या लाटेची भीती संपुर्ण देशाला असताना.  प्रत्येक राज्यात शुटींगसाठी (Film Shooting) परवानगी दिल्याने बंद पडलेले चित्रीकरण आता पुन्हा सुरू होत आहे. अनेक सिनेअभिनेते (Actor)सेटवर परतले आहेत. सनी लियोनीने (Sunny Leone) पुन्हा तिच्या दक्षिण भारतीय चित्रपट (South Movie) शेरोच्या (Shero) शूटिंगला सुरुवात केली आहे. याची माहिती सनीने ट्विट (Tweet) करत दिली आहे. सनीने लिहिले की, "शेवटी माझ्या दक्षिण भारतीय चित्रपटाची शूटिंग पुन्हा सुरू केली. काही आश्चर्यकारक लोकांसोबत काम करत आहे. तसेच सर्जनशील लेखक आणि दिग्दर्शक श्रीजित विजयन (Sreejith Vijayan) यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करणार आहे. सनीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने तिचे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवतात.  सनी आता पुन्हा एका वेगळ्या अंदाजात पहायला मिळणार असल्याने या चित्रपटासाठी तिच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळत आहे.

शेरो हा एक मनोवैज्ञानिक थ्रिलर (psychological thriller) चित्रपट आहे. जो बॉलीवूडचे दिग्दर्शक श्रीजित विजयन यांनी दिग्दर्शित केला आहे. सनी या चित्रपटात दक्षिण भारतीय महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट मल्याळमसह दक्षिणच्या सर्व भाषांमध्ये प्रदर्शित होईल. मल्याळममधील तिचा हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटापूर्वी तिने आणखी एक मल्याळम फिल्म 'रंगीला' जाहीर केली होती. या आधी ती 'मधुरा राजा' चित्रपटाच्या आयटम सॉंगचा एक भाग होती आणि तेव्हापासून तिचे टॉलीवूडमध्ये प्रचंड प्रमाणात चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

अलीकडेच सनीने मुंबईत एक नवीन घर विकत घेतले आहे. आपल्या कुटुंबात नवीन घरात प्रवेश केल्याची करतानाचे फोटो सनीने सोशल मीडियावर शेअर केले होते.  लॉस एंजेलिसमध्येही या जोडप्याचेही एक घर आहे.

सनी लियोन सध्या ‘स्प्लिट्सविला’ या ताज्या सीझनची शूटिंग करत आहे. देव्हंग ढोलकिया दिग्दर्शित ‘बुलेट्स’ नावाच्या दिग्दर्शनात या अभिनेत्रीला अखेरच पाहिले होते. वेब सीरिजमध्ये करिश्मा तन्ना अभिनय केला असून एमएक्सप्लेअरवर रिलीज झाला. सनीकडे सध्या अनामिका ही  सिरीज देखील आहे. हे विक्रम भट्ट यांनी लिहिलेले व दिग्दर्शन केले असून यात सोननल्ली सेगल हे एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.