Sukesh Chandrashekhar Message To Arvind Kejriwal: तिहार तुरुंगात (Tihar Jail) बंद असलेला ठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्यांच्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना लिहिलेले पत्र. अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सुकेशने केजरीवाल यांचा खरपूस समाचार घेत त्यांचे तिहार तुरुंगात स्वागत केले आहे. याआधीही सुकेशने एक पत्र लिहिले होते, ज्यात त्यांनी केजरीवाल आणि तुरुंगात असलेल्या त्यांच्या मंत्र्यांचा पर्दाफाश करणार असल्याचं म्हटलं होतं. अरविंद केजरीवाल यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात सुकेशने लिहिले आहे की, 'प्रिय बंधू अरविंद केजरीवाल, तिहार क्लबमध्ये तुमचे स्वागत आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही सत्याचा विजय झाला. ही नव्या भारताची ताकद आहे. कायद्याच्या वर काहीही नाही याचे हे उत्तम उदाहरण आहे. ही खूप चांगली संधी आहे. माझा वाढदिवस 25 मार्चला आहे. या दिवशी दुहेरी आनंद साजरा केला जाईल. मी तुमची अटक माझी सर्वोत्तम भेट मानतो.'
सुकेशने पुढे लिहिले आहे की, 'तुमची सर्व विधाने आणि कट्टर प्रामाणिकपणाचे नाटक अखेर संपले. मला खूप आनंद आहे की माझे तीन भाऊ आता तिहार क्लब चालवायला आले आहेत, बिग बॉसचे अध्यक्ष - अरविंद केजरीवाल, सीईओ - मनीष सिसोदिया आणि सीओओ - सत्येंद्र जैन.' (हेही वाचा - Viral Video: सुकेश चंद्रशेखरने फिल्मी स्टाईलमध्ये दिल्या Jacqueline Fernandez ला 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा, पहा व्हिडीओ)
सुकेश चंद्रशेखरने पुढे लिहिलं आहे की, केजरीवाल जी, सत्य जास्त काळ लपून राहू शकत नाही हे तुम्हाला माहीत नव्हते. मुख्यमंत्री असताना तुम्ही किमान 10 वेगवेगळे घोटाळे केले. त्यात दिल्लीतील गरिबांची लूट झाली आहे. तुमचे चार घोटाळे मी स्वतः पाहिले आहेत आणि माझ्याकडे पुरावेही आहेत. हे रामराज आहे. असं तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमच्या भ्रष्टाचाराची आणि कृत्याची शिक्षा स्वतः भगवान श्रीरामांनी दिली आहे. देव सर्व काही पाहतो.' (हेही वाचा - Jacqueline Fernandez: जॅकलीनची सुकेशच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे धाव, जेलमधून धमकी दिल्याचा आरोप)
जेल पूर्णपणे तुमच्या अखत्यारीत आहे. तुरुंग अधिकारी तुमचे कठपुतळे आहेत, पण मी त्यांचाही पर्दाफाश करेन. मला माहित आहे की तुम्ही माझा बदला घेताल. मला वाटतं आता तुम्ही त्याच जेलमधून काम करालं. तुमचे सहकारी आणि तुमचा पक्ष हा जगातील सर्वात मोठा भ्रष्ट पक्ष असल्याचे मी सिद्ध करून दाखवेन, असेही सुकेशने आपल्या पत्रात म्हटलं आहे.
तथापी, केजरीवाल यांनी अटकेनंतर देशाला पत्र लिहिले आहे. ज्याचे वाचन त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी केले. या पत्रात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भाजपचा द्वेष करू नका आणि त्यांना भाऊ-बहिणीसारखे समजण्यास सांगितले आहे. 21 मार्च रोजी ईडीने केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती. यानंतर 22 मार्च रोजी तपास यंत्रणेने त्याला विशेष न्यायालयात हजर केले. तीन तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 28 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला.