SRIDEVI BUNGALOW Official Teaser 2: प्रिया प्रकाश हिच्या रोमँटिक अंदाजातील 'श्रीदेवी बंगलो' चित्रपटाचा टीझर लॉन्च
श्रीदेवी बंगलो (Photo Credits: Youtube)

आपल्या नजरांच्या अदांनी घायाळ करणारी प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) हिचे सोशल मीडियावर फॅन फोलअर्स खुप वाढत चालले आहेत. तर आपल्या करियअरमध्ये प्रिया मोठे पाऊल उचलत असून आगामी चित्रपट 'श्रीदेवी बंगलो' (Sridevi Bungalow) मधून ती झळकणार आहे. या चित्रपटाचा आज दूसरा टीझर लॉन्च करण्यात आला. टीझरमध्ये प्रिया अत्यंत रोमँटिक अंदाजात दिसून येत आहे.

चित्रपटातील टीझरमधून तिने श्रीदेवीची भुमिका साकारली आहे. त्यामध्ये साकारत असलेल्या भुमिकेच्या माध्यमातून प्रिया एक यशस्वी अभिनेत्रीच्या रुपात दिसणार आहे. या टीझरमध्ये प्रिया हिच्यासोबत प्रियांशु चटर्जी सुद्धा झळकणार आहे.(हेही वाचा-Sridevi Banglow Teaser: 'श्रीदेवी बंगलो' टीझर वादाच्या भोवऱ्यात, बोनी कपूर यांच्याकडून दिग्दर्शकांना नोटीस)

मात्र श्रीदेवी यांना कोणताच ट्रिब्युट किंवा त्यांच्या आयुष्यावर आधारित नसल्याची कबुली दिली होती. तरीही या टीझरमुळे श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी या विरुद्ध संताप व्यक्त केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत मंबुली यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्या होत्या.