Sridevi Banglow Teaser: 'श्रीदेवी बंगलो' टीझर वादाच्या भोवऱ्यात, बोनी कपूर यांच्याकडून दिग्दर्शकांना नोटीस
श्रीदेवी बंगलो चित्रपट पोस्टर (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Sridevi Banglow Teaser:  गेल्या वर्षात एका व्हिडिओमुळे लाखो प्रेक्षकांची मने जिंकलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया वारिअर (Priya Prakash Varrier) ही सध्या तिचा आगामी चित्रपट 'श्रीदेवी बंगलो' (Sridevi Banglow) मधून मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. परंतु या टीझरमुळे श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी या विरुद्ध संताप व्यक्त केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत मंबुली यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्या असल्याचे सांगितले जात आहे.

'श्रीदेवी बंगलो' हा चित्रपट बॉलिवूड डेब्यू म्हणून निर्मिती करण्यात आलेला आहे. तसेच प्रिया वारिअर ही श्रीदेवी नावाची मुख्य भुमिका साकारताना दिसली आहे. या टीझर मध्ये श्रीदेवींचे काही प्रसंग दाखविण्यात आले असली तरीही टीझरच्या शेवट हा विचलित करणारा आहे. तसेच श्रीदेवी यांच्या मृत्यृचे गूढ कशापद्धतीने झाले असल्याची एक झलक यामधून दाखविण्यात आलेली आहे. मात्र श्रीदेवी यांना कोणताच ट्रिब्युट किंवा त्यांच्या आयुष्यावर आधारित नसल्याची कबुली दिली जात आहे.

मात्र चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी याबाबत स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, बोनी कपूर यांच्या कडून या चित्रपटाबाबत नोटीस धाडण्यात आलेली आहे. परंतु हा चित्रपट एका सस्पेन्स थ्रिलर कथेवर आधारित आहे. तसेच श्रीदेवी हे एक कॉमन नाव असून त्यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट नसल्याचे स्पष्ट मतं त्यांनी बोनी कपूर यांच्या समोर मांडले आहे. त्यामुळे प्रिया वारिअरचा हा आगामी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या वादाचा फटका कितीवर जातो हे पाहण्याजोगे ठरणार आहे.