Photo Credit - Instagram

Sonakshi-Zaheer Wedding : बॉलीवूड (Bollywwod Wedding)अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे 23 जून रोजी लग्नबंधनात (Sonakshi Sinha Zaheer Wedding)अडकले. नोंदणी पद्धतीने विवाह केल्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले. सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाला दोघांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि काही मोजके मित्रमंडळी उपस्थित होते. लग्नानंतर संध्याकाळी ग्रँड रिसेप्शन पार्टीचं (Sonakshi Sinha Zaheer Wedding Reception)आयोजन करण्यात आलं होतं. अभिनेत्रीच्या रिसेप्शनला रिचा चड्ढा, अली फजल, रवीना टंडन, शर्मिन सेगल, काजोल (Kajol), रेखा, अदिती राव हैदरी, सिद्धार्थ, अनिल कपूर, सलमान खान, अर्पिता खान असे अनेक कलाकार उपस्थित (Bollywwod Celebrity Wedding)होते. अशातच अभिनेत्री काजोलचा एका व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सोनाक्षीने रिसेप्शन पार्टीला सुंदर अशी लाल रंगाची साडी, त्यावर साजेसे पारंपरिक दागिने केसात गजरा, हातावर मेहंदी असा लूक केला होता. (हेही वाचा: Sonakshi-Zaheer Wedding: सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल अडकले विवाह बंधनात, लग्नाचे सुंदर फोटो आले समोर)

सोनाक्षी सिन्हाला नववधूच्या रुपात पाहून काजोल अगदी भारावून गेली होती. तिच्या प्रतिक्रीयेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘फिल्मीग्यान’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सोनाक्षीला पाहून काजोलने आपले दोन्ही हात गालावर ठेवून भारावून गेल्याची प्रतिक्रिया दिली. तिचे डोळे देखील पाणावले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

काजोल आणि सोनाक्षीने या पार्टीत एकमेकींना घट्ट मिठी मारली. यावेळी सोनाक्षी देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर या नवीन जोडप्याने काजोलबरोबर डान्स केला. काजोल आणि सोनाक्षीचं हे सुंदर बॉण्डिंग याआधी कोणीही पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे नेटकऱ्यांनी सुद्धा त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.