अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक अनुभव सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात तिने न्यूड कॅटवॉक करायला सांगणारा तिचा बॉयफ्रेन्ड आज तिच्याकडेच काम करत असल्याचे सांगितले आहे.
शर्लिनच्या आायुष्यावर आधारीत 'द लास्ट विश' नावाची शार्टफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शॉर्टफिल्मने प्रेक्षकांची मनच जिंकली नाहीत तर शर्लिनला मोठी कामे देखील करून दिली. शर्लिनने पहिल्याच दिवशी या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून तब्बल 10 लाख रुपयांची कमाई केली आहे.
पहा काय सांगतेय शर्लिन तिच्या शॉर्टफिल्म बाबत
अभिनय, रॅप, निर्मिती अशा विविध क्षेत्रात शर्लिन सध्या काम करत आहे व या शॉर्टफिल्म नंतर ती एका वेब सिरीजची निर्मिती देखील करणार आहे.
शर्लिनच्या आधी सनी लिओनी हीच पॉर्न स्टार ते अभिनेत्री असा प्रवास दाखवणारी वेब सिरीज देखील प्रदर्शित झाली होती. आणि त्याही सिरीजला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दर्शवली.