Sharad Ponkshe (PC - Facebook)

महाराष्ट्रामध्ये काल (17 जुलै) दिवशी राज्य शिक्षण मंडळाने 12वीचा निकाल जाहीर केला. दरम्यान या निकालामध्ये मुलींची सरशी बघायला मिळाली. अभिनेते शरद पोंक्षे यांच्या लेकीने देखील विज्ञान शाखेमध्ये 87% मिळवले आहेत. शरद पोंक्षे यांनी फेसबूक पोस्ट लिहीत स्नेहाचं कौतुक केले आहे. यामध्ये त्यांनी '२०१९ माझे कर्करोगावरील ऊपचार चालू असताना, हाॅस्पिटलमधे येऊन काॅलेज अभ्यास करून एवढ्या टेंशनमधे असतानाही पिल्लून ८७% मार्क १२ विज्ञान शाखेत मिळवले अभिमान वाटला मला, व सतत वाईट बातम्या चहूबाजूनी येत असताना एवढी चांगली बातमी सांगायला आनंद होतोय.' असा मेसेज लिहीला आहे.

दरम्यान मागील वर्षी शरद पोंक्षे यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर मुंबईत त्यांच्यावर उपचार झाले आणि या आजारातून आता ते मुक्त झाले आहे. मात्र या संकटकाळात लेकीने वडिलांच्या कॅन्सरच्या लढ्याचं टेन्शन आणि विज्ञान शाखेतील 12वीचा अभ्यास हा सांभाळून अभ्यास केला केला. घवघवीत यश मिळवलं यामुळे ते भारावले आहेत. दरम्यान आजारावर मात केल्यानंतर अग्निहोत्र ही मालिका, हिमालयाची सावली सारखं नाटकं यामधून काम करायला पुन्हा सुरूवात केली आहे. कॅन्सर वर मात पुन्हा सज्ज झालेल्या शरद पोंक्षे साठी किशोर कदम यांचा भावनिक संदेश.

शरद पोंक्षे यांची फेसबूक पोस्ट

शरद पोंक्षे हे कसदार कलाकार म्हणून ओळखले जातात. वादळवाट मधील ; देवराम खंडागळे' ही नकारत्मक भूमिका असो किंवा 'मी नथुराम गोडसे' सारखे चर्चित नाटक असो त्यांनी अभिनयासोबतच वेळोवेळी आपली परखड भूमिका देखील मांडली आहे.