Sharad Pawar On Kashmir File: 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर शरद पवारांची प्रतिक्रिया, समाजात फूट पाडणारे लेखन किंवा चित्रपट टाळावेत
NCP Chief Sharad Pawar (Photo Credits: ANI)

विवेक आग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir File) या चित्रपटाबाबत राजकीय पक्षांमध्ये वाद सुरू झाला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी पुणे जिल्ह्यात (Pune) एक मोठे विधान केले आहे. काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित चित्रपटावर काँग्रेस पक्षाला दोष देण्यासाठी या चित्रपटाचा वापर केला जात असून, त्यावेळी जे काही घडले, त्यावेळी देशात काँग्रेसचीच (Congress) सत्ता होती, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पवार म्हणाले. आम्ही तुम्हाला सांगतो की, त्यावेळचा इतिहास पाहिला तर, जेव्हा काश्मिरी पंडितांचे पलायन झाले तेव्हा विश्वनाथ प्रताप सिंह केंद्रात देशाचे नेतृत्व करत होते.

वास्तविक, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बारामती, पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना दावा केला की, व्ही.पी. सिंह यांच्या सरकारला भाजपच्या काही सदस्यांचा पाठिंबा होता. यावेळी पवार म्हणाले की, मुफ्ती मोहम्मद सईद हे भाजपच्या मदतीने केंद्रीय गृहमंत्री झाले. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांचा काँग्रेसशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नव्हता.

काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या वेळी काँग्रेसचे सरकार नव्हते

त्याचवेळी शरद पवार म्हणाले की, ""जेव्हा हे सर्व घडले, तेव्हा देशात काँग्रेसची सत्ता होती, हे दाखवण्यासाठी काँग्रेस पक्षाला दोष देण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण अभ्यास केला तर हे सगळ विश्वनाथ प्रताप सिंग देशाचे नेतृत्व करत असताना घडले. मात्र, आता या मुद्द्यावरून गदारोळ करणारे भाजपचे काही लोक त्यावेळी सिंह यांना पाठिंबा देत होते. त्यांनी सांगितले की, त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री असलेले मुफ्ती मोहम्मद सईद यांनी भाजपच्या मदतीने हे पद मिळवले. (हे देखील वाचा: Nana Patekar On Kashmir File: 'द काश्मीर फाइल्स’च्या वादावर नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले - विनाकारण वाद निर्माण करणे योग्य नाही)

समाजात फूट पाडणारे लेखन किंवा चित्रपट टाळावेत

विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित आणि झी स्टुडिओ निर्मित, 'द काश्मीर फाइल्स' पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांकडून हिंदू समुदायाच्या लोकांच्या नियोजित हत्येनंतर काश्मिरी हिंदूंचे म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधील पंडितांचे पलायन दाखवते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, समाजात फूट पाडणारे लेखन किंवा चित्रपट टाळले पाहिजेत.