किंग खानच्या वाढदिवसानिमित्त जोरदार तयारी सुरु; असा सजला शाहरुखचा अलिशान 'मन्नत'
शाहरुख खान (Photo Credits: Facebook SRK FanPage)

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान 2 नोव्हेंबरला आपला 53वा वाढदिवस साजरा करीत आहे. किंग खानचा वाढदिवस म्हणजे बॉलीवूडकरांसाठी तसेच शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक मोठा सणच आहे. याच निमिताने वेगवेगळ्या कार्याक्रमांसोबत शाहरुखच्या अलिबागच्या फार्महाउसवर जंगी पार्टीचेही आयोजन केले जाते. हीच वेळ साधून शाहरुखचे चाहते लांबून त्याला शुभेच्छा देण्यासाठी, त्याची एक झलक पाहण्यासाठी मन्नतसमोर गर्दी करतात. अशातच वाढदिवसाला फक्त 2 दिवस शिल्लक असताना, शाहरुखचा जीव की प्राण असणाऱ्या 'मन्नत' या आलिशान बंगल्यावर त्याच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू आहे.

सोशल मीडियावर 'मन्नत'चे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये 'मन्नत'वर केलेली आकर्षक रोषणाई दिसून येत आहे.

दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शाहरुख आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये येऊन आपल्या चाहत्यांना दर्शन देतो.

 

यावर्षी अलिबाग ऐवजी शाहरुख त्याच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याच्या निमित्ताने तो मन्नतमध्येच एका खास कार्यक्रमाचे आयोजन करु शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.