मुंबई: जेष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातून डिस्चार्ज
शबाना आजमी (फोटो सौ. इंस्टाग्राम)

जेष्ठ अभिनेत्री शबाना आजमी (Shabana Azmi) यांचा वाहनाला गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात झाला होता. या अपघात शबाना आजमी गंभीर जखमी झाल्या होत्या. दरम्यान, शबाना आजमी यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात (Kokilaben Dhirubhai) Ambani Hospital घेऊन जाण्यात आले. तब्बल दोन आठवडा उपचार घेतल्यानंतर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्या जुहू येथील निवासस्थानी परतल्या आहेत. तसेच डॉक्टरांनी त्यांना आराम घेण्याचा सल्ला दिला आहे.

जेष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला 18 जानेवारी रोजी अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच या अपघातात शबाना गंभीर जखमी झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघात शबाना आजमी यांच्या चेहऱ्यावर अनेक जखमा झाल्या होत्या. त्यावेळी स्थानिक लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर दोन आठवडे उपचार सुरू होते. पंरतु, आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- कमनीय बांध्याच्या अमिषा पटेलचा 44 व्या वर्षी जलवा; Hot आणि Sexy फोटोजवर चाहते फिदा (See Photos)

शबाना आझमी यांचे पती जावेद अख्तर यांचा 75 वा वाढदिवस नुकताच पार पडला. गेली तीन दिवस हा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात होता. त्यासाठी विविध पार्टी, प्रदर्शन आणि कार्यक्रमांचे आयोजन केले होते. खास करुन जावेद अख्तर यांच्या वाढदिवसानिमित्त शबाना आझमी यांनी आयोजित केलेल्या एका पार्टीला आमिर खान, दीपिका पादुकोण, किरण राव यांच्यासह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमांनतर शबाना आझमी पुण्याला निघाल्या होत्या. दरम्यान, त्यांच्या वाहनाला अपघात घडला.