एका सोशल मीडिया पोस्टवरुन 'ही' गायिका कमावते तब्बल २४ कोटी  !
सेलिना गोमेज Photo Credits- Instagram

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल नेटवर्क वाढवण्यासाठी अनेक सोशल साईट्स वापरल्या जातात. पण आता सोशल मीडिया पोस्टवरुन कमाईचे पर्यायही उपलब्ध झाले आहेत. असे काही सेलिब्रेटी आहेत जे एका पोस्टवरुन करोडो रुपये कमावतात. यापैकीच एक म्हणजे हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका सेलिना गोमेज. एका मॅगझिनच्या रिपोर्टनुसार, 26 वर्षीय सेलिना एका सोशल मीडिया पोस्टवरुन सुमारे 3.5 मिलियन डॉलर म्हणजेच 24 कोटी रुपये कमावते.

सेलिनाविषयी काही खास गोष्टी:

# वेगवेगळ्या ब्रॅंडचे फुडवेअर्स, स्नीकर्स, जॅकेट, आऊटफिट्स घालून फोटोज शेअर करत असते.

# इंस्टाग्रामवर सेलिनाचे 141 मिलियन फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या सेलिब्रेटींपैकी ती एक आहे.

# गायनासोबतच ती तिच्या अभिनय कौशल्यामुळेही चर्चेत असते. एमी पुरस्कार विजेती टेलिव्हीजन मालिका 'विजार्ड ऑफ वेवर्ली प्लेस' मधील एलेक्स रुसोच्या भूमिकेसाठीही ती ओळखली जाते.

# 'सेलिना गोमेज अँड द सीन' नावाच्या पॉप ब्रँडची ती प्रमुख गायिका आहे.

# सप्टेंबर 2017 मध्ये सेलिनाची किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी झाली होती. तिची मैत्रिण फ्रान्सिया रेसियाने तिला किडनी दान केली होती. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेली सेलिना डिप्रेशनमध्ये गेली होती.

# पॉप स्टार जस्टिन बीबरसोबत सेलिना रिलेशनशिपमध्येही होती.