Savdhaan India आणि Crime Patrol फेम 2 अभिनेत्रींच्या हातातून घडला गुन्हा, सीसीटीव्ही फुटेज समोर येताच मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिका 'क्राइम पेट्रोल' (Savdhaan India) आणि 'सावधान इंडिया' (Crime Patrol) यांमध्ये अभिनय करणाऱ्या दोन अभिनेत्रींना मुंबईत (Mumbai) अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत चोरी (Robbery) केल्याचा आरोप आहे. कोरोना काळात या मालिकांचे चित्रीकरण बंद असल्यामुळे दोघी अभिनेत्रींना पैशांची कमतरता जाणवत असल्यामुळे त्यांनी चोरी केल्याची दिली कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही मुलींना चोरीच्या सामानासहित अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात केले. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये राहणारी सुरभी श्रीवास्तव (वय, 25) टीव्ही मालिकांमध्ये काम करत होती. तिच्यासोबत मोहसिना शेखही (वय, 19) मालिकांमध्ये काम करून तिचा निर्वाह करत होती. या दोघेही काही महिन्यांपूर्वी मैत्रिणीच्या घरी राहण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी आरे कॉलनी येथील उच्चभ्रू परिसरात त्यांच्यासोबत भाड्याने राहणाऱ्या मुलींचे सामान चोरायला सुरुवात केली. दरम्यान, त्यांनी इतर मुलींचे सामानासह 3 लाखाहून अधिक रक्कम गायब केली. याप्रकरणात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. मात्र त्यांनी गुन्हा कबूल करण्यास नकार दिला. अखेर पोलिसांनी त्यांना सीसीटीव्ही फूटेजमध्ये त्यांच्या हातात असलेली पैशांची पिशवी दाखवली. त्यानंतर दोघींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.  हे देखील वाचा-Fake COVID-19 Vaccine Scam: बनावट लस घोटाळयामध्ये Tips Industries ची फसवणूक; 365 कर्मचार्‍यांना अद्याप प्रमाणपत्र मिळाले नाही- Ramesh Taurani

एएनआयचे ट्वीट-

 

कोरोना काळात काम बंद झाल्यामुळे अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी असे गुन्हे केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यावर्षी एप्रिलमध्येही असेच एक प्रकरण समोर आले होते. मालिकांमध्ये छोट्या भूमिका करणार्‍या अजय शुक्ला नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. अजय हा लोकांकडून डेबिट कार्ड हिसकावून त्यातील पैसे काढून घेत होता. तसेच त्याच्याजवळ 50 हून अधिक डेबिट कार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.