Sapna Choudhary New Video: सपना चौधरीचा आणखी एक धम्माल व्हिडिओ चाहत्यांच्या भेटीला, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
सपना चौधरी (Photo Credits: Instagram)

हरियाणाची सुप्रसिद्ध डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) ही नेहमीच चर्चेत असते. सपनाने आपल्या डान्सच्या माध्यमातून मोठी पसंती मिळवली आहे. ती सतत सोशल मीडियावर (Social Media) तिचे फोटो किंवा व्हिडिओ टाकून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सपनाच्या डान्स व्हिडिओचा तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तिची एक झलक पाहण्यासाठी अनेकजण उस्तुक असतात. यातच सपनाने तिच्या चाहत्यांसाठी एक धमाकेदार व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ती या व्हिडिओ एका वधु सारखी दिसत आहे. सपना चौधरीचा हा नवा अंदाज चाहत्यांच्या मनावर भुरळ घालताना दिसत आहे.

सपना चौधरीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सपना चौधरी या व्हिडिओत वधुसारखे कपडे परिधान केले आहेत. तिने गुलाबी रंगाचा घागरा घातला आहे. वधुसारखी सजलेली सपना या व्हिडिओत खूपच सुंदर दिसत आहे. सपनाचा लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. तसेच या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव केला जात आहे. हे देखील वाचा- Sapna Choudhary: स्टेजवर आग लावणाऱ्या सपना चौधरीचा घरात केलेला जबरदस्त डान्स बघितलात का? पाहा संपूर्ण व्हिडिओ

इन्स्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

दरम्यान, सपना चौधरीची लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. तिने कधीही आपला देसी अवतार आणि नृत्य करण्याची शैली टाळली नाही. ती आजही तिच्या चाहत्यांचे त्याच अंदाजात मनोरंजन करत आहेत. ज्यामुळे तिने केलेल्या कोणत्याही पोस्टवर काही क्षणातच लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव पाहायला मिळतो.