Photo Credit- Instagram

‘Gulaabi Saadi’ Song Reaches 300 Million Views on YouTube: गुलाबी साडी गाण्याने युट्यूबवर 300 मिलीयनहून अधिक व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे. इतिहासात पहिल्यादाज कमी काळात एवढ्या मोठ्या व्ह्यूजचा टप्पा गाठण्याची किमया एखाद्या मराठी गाण्याने केली आहे.  त्यामुळे आनंदीत होऊन सिंगर  संजू राठोड याने त्याच्या इंस्टाग्रामवर ही आनंदाची माहिती दिली. त्याने युट्यूबवरील गाण्याच्या  व्ह्यूजचा स्क्रिन शॉट पोस्ट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. गाण्याने 300 मिलीयनहून अधिक व्ह्यूज मिळवल्याबद्दल त्याने सर्वांचे आभार मानले. मराठी संगीताचा दर्जा उंचावत राहू आणि आणखी मोठे यश मिळवू असे लिहीले आहे. (Actor Radhika Apte Pregnant: अभिनेत्री राधिका आपटे होणार आई; BFI London Film Festival च्या रेड कार्पेट वरील पहा फोटोज)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by SANJU RATHOD (@sanjurathod07)

संजू राठोडने पोस्ट मध्ये काय म्हटले

'गुलाबी साडी गाण्याने 300 मिलीयनहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत, ज्याने मला माझ्या कारकिर्दीत यशाच्या एका नवीन स्तरावर नेले आहे. मी माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या सर्व श्रोत्यांचा त्यांच्या अतूट पाठिंबाबद्दल मनापासून आभारी आहे'. पुढे त्याने लिहिले की, 'ही केवळ आपल्या प्रवासाची सुरुवात आहे. एकत्र मिळून आपण मराठी संगीताचा दर्जा उंचावत राहू आणि आणखी मोठे यश मिळवू.'