Kannada Actress Samyuktha Hegde and Friend Assaulted (Photo Credits: Instagram)

Roadies, Splitsvilla व कन्नड सिनेमातील अभिनेत्री समयुक्ता हेगडे (Samyuktha Hegde) सोबत घडलेला आजचा प्रसंंग पाहुन बाईच बाईची मोठी शत्रु असते हे वाक्य अगदी खरोखर आहे असेच म्हणावे लागेल. काही वेळापासुन ट्विटर वर समयुक्ता हेगडे च्या समर्थनार्थ हॅशटॅग ट्रेंड होत आहे. सकाळी बंंगळूरु (Bangalore) मध्ये आग्रा लेक येथे एका पार्क मध्ये समयुक्ता आपल्या मैत्रींंणी सोबत वर्क आउट करत होती, यावेळी तिने Sports Bra घातली जी बघुन या पार्क मध्ये आलेल्या कॉंग्रेस प्रवकत्या कविता रेड्डी (Kavitha Reddy) यांंनी चक्क समयुक्ता वर हल्ला केला, इतकंच नव्हे तर अत्यंत गलिच्छ शब्दात तिच्यावर टीका सुद्धा केल्या, हा सगळा प्रकार सुरु होताच त्या पार्क मध्ये इतकी गर्दी जमली की हे भांंडण सोडवायला पोलिसांंना सुद्धा मध्ये पडावे लागले, विशेष म्हणजे काही वेळाने तिथे जमलेल्या मंंडळींंनी समयुक्ता च्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली, तु ड्रग्स घेउन इथे सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करतेय इथवर या टीकाकारांनी तिला बोल लावले.

हा सगळा प्रकार घडत असताना समयुक्ता ने आपल्या फॅन्स ना याबाबत माहिती देत एक व्हिडिओ बनवुन पोस्ट केला होता, जो आता शेअर करत अनेकांनी तिला पाठिंंबा दर्शवला आहे. या व्हिडिओ मध्ये आपल्याला हल्ला करणारी महिला, आणि घोषणा देणारे स्वंयघोषित कार्यकर्ते सुद्धा पाहायला मिळतायत. यामध्ये मुख्य म्हणजे पोलिस सुद्धा या प्रकरणात कारवाई करण्याऐवजी माफी मागुन भांंडण संंपवा असे सल्ले देताना दिसत आहेत.

समयुक्ता हेगडे पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Samyuktha Hegde (@samyuktha_hegde) on

दुसरीकडे, समयुक्ता चा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांंनी कविता रेड्डी यांंना ट्रोल करण्यास सुरुवात केली ज्यावर रेड्डी यांंनी उत्तर देत मला अशा खोट्या पब्लिसिटी करणार्‍या नट्यांंच्या व्हिडिओने काहीही फरक पडत नाही असे म्हंंटले आहे.

कविता रेड्डी ट्विट

दरम्यान यापुर्वी सुद्धा कपड्यांवरुन तरुणींना टार्गेट करत सुनावल्याचे, बलात्काराच्या धमक्या दिल्याचे प्रकार घडले आहेत. अशा घटना स्वातंंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या पुरस्कर्त्या भारतात खरोखरच मान खाली घालायला लावणार्‍या आहेत.