
Netflix वरील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'सेक्रेड गेम्स' (Sacred Games 2 ) वेब सीरिजचा दुसरा सीझन 15ऑगस्ट ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैफ अली खान, नवाझुद्दीन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या वेब सीरीजचं काऊंटडाऊन आता सुरू झालं आहे.' तत्पूर्वी सेक्रेड गेम्स'च्या पुढच्या सीझनमध्ये कोण कलाकार असतील हे जाहीर करण्यात आलं असून, यावेळेस या सीरिज मध्ये मराठमोळा अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) दिसणार आहे. 'फास्टर फेणे' मध्ये हेर, तर 'मुरांबा' आणि 'गर्लफ्रेंड' मध्ये प्रियकराच्या भुमिका केल्यानंतर, अमेय वाघ थेट हिंदीच्या या गाजलेल्या वेबसिरीजमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. Sacred Games 2 Trailer पहा.
यासंदर्भात अमेयने स्वतः माहिती देत सांगितले की, 'सेक्रेड गेम्स'चा पहिला भाग प्रदर्शित झाल्यांनतर मी तो एका बैठकीतच संपूर्ण बघितला होता. अशा वेब सीरिजमध्ये काम करायला मिळावं असं तेव्हा त्याला वाटलं होतं. हे स्वप्न आता पूर्ण झालं आहे. तर आपल्या भूमिकेविषयी बोलताना अमेय सांगतो, " मी काही ऑडिशन दिल्या होत्या, दुर्दैवाने पहिल्याच फटक्यात माझी निवड झाली नाही पान काहीच दिवसात मला पुन्हा ऑडिशनसाठी बोलवण्यात आले ज्यात माझी एका भूमिकेसाठी निवड झाली. या सीरिजमधील अमेयचा ट्रॅक दिग्दर्शक नीरज घेवान यांनी दिग्दर्शित केलाय. यापूर्वी नीरजने 'मसान' या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. 'सेक्रेड...'मधल्या भूमिकेविषयी सध्या फार काही सांगता येणार नाही. पण, आजवर मी साकारलेली नाही अशा व्यक्तिरेखेत मी असेन. ती व्यक्तिरेखा काहीशी खलनायकी धाटणीची आहे, असेही अमेय म्हणाला.
दरम्यान, 15 ऑगस्ट पासून सेक्रेड गेम्स 2 नेटफ्लिक्सवर पाहता येणार असली तरीही वन प्लसच्या (One Plus) युजर्सना एक दिवस आधीच हा शो पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यासाठी खास रजिस्ट्रेशन खुलं करण्यात आलं असून निवडक लोकांना उद्या हा शो पाहता येणार आहे. मुंबई सह बेंगळूरू, दिल्ली मध्ये सेक्रेड गेम्स 2 साठी खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं आहे. प्रेक्षकांना या शोचा दिग्दर्शक अनुराग कश्यप सोबत खास स्क्रिनिंग पाहता येणार आहे. मुंबईत लोअर परेल येथील फिनिक्स मॉलमधील PVR मध्ये संध्याकाळी 7 वाजता खास शोचं आयोजन करण्यात आलं आहे.