बॉलिवूड मधील नामांकित कोरियोग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूजा ( Remo Dsouza) याला आज दुपारच्या वेळेस हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे रेमो डिसूजा याला उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरियोग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक अहमद खान यांनी या ABP MAZA सोबत या बातमीची पुष्टी केली आहे. रेमो याच्यासोबत पत्नी लिज डिसूजा तेथे उपस्थितीत आहे.(Dilip Kumar: अभिनेता दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत पत्नी सायरा बानो यांनी दिली महिती)
तर IWMBuzz यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, रुग्णालयात रेमो डिसूजावर अॅंजियोप्लास्टी सर्जरी करण्यात आली आहे. त्यानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे.(VJ Chitra Death: वयाच्या 28 व्या वर्षी अभिनेत्री वीजे चित्रा हिचा मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय)
View this post on Instagram
रेमो डिसूजा याचा स्ट्रिट डान्सर चित्रपट याच वर्षात जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. यामध्ये वरुण धवन, श्रद्धा कपूर मुख्य भुमिकेत दिसून आले आहेत. या चित्रपटासाठी संमिश्र प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या होत्या. या व्यतिरिक्त एबीसीडी, एबीसीडी 2, रेस 3 सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.