रति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज?
अक्षरा हासन (photo credits: Instagram)

काही दिवसांपूर्वी अभिनेता कमल हासनची कन्या अक्षरा हासन हिचे प्रायव्हेट फोटोज लीक झाले आणि सर्वत्र एकाच खळबळ माजली. 27 वर्षीय अक्षराचे हे अंडरगारमेंट्समधील फोटोज होते. हे फोटो अ‍ॅक्ट्रेस दीवाना नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले होते. याबाबत अक्षराने मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे तक्रारदेखील दाखल केली होती. सोशल मिडियावरदेखील तिने आपला संताप व्यक्त केला होता. मात्र आता या प्रकरणाला एक मोठी कलाटणी मिळाली आहे. झालेल्या घटनेबाबत पोलिसांना प्रसिद्ध अभिनेत्री रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुज विरवानी याच्यावर संशय आहे.

अक्षराने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी आपल्या तपासाला सुरुवात केली. आधीपासून पोलिसांना अक्षराच्या मित्रांवर संशय होता. मात्र अक्षराने दिलेल्या माहितीनुसार फक्त तनुजकडेच अक्षराचे हे प्रायव्हेट फोटोज होते. अक्षरा आणि तनुज हे 2013 ते 2016 या दरम्यान रिलेशनशिपमध्ये होते. त्या काळात अनुजसोबत अक्षराने हे फोटोज शेअर केले होते. पोलिसांना तनुजवर असलेला संशय खरा आहे का खोटा याची शहानिशा करण्यासाठी वर्सोवा पोलिसांनी तनुजला चौकशीसाठी बोलावण्याचे ठरवले आहे.

एका इंग्रजी दैनिकाने तनुजशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्याऐवजी तनुजच्या प्रवक्त्यानेन तनुजकडे अशा प्रकारचे कोणतेही फोटोज नसल्याचे सांगितले आहे. तसेच तनुज आणि अक्षरा हे ब्रेकअपनंतरही एकमेकांचे अतिशय चांगले मित्र असल्याने, तनुजकडून अशा प्रकारचे कोणतेही कृत्य घडणे शक्य नसल्याचेही सांगितले आहे. 31 वर्षीय तनुजने 2013 मध्ये ‘लव यू सोनिया’द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. विशेष म्हणजे, तनुजची आई रति अग्निहोत्री हिने 1981 मध्ये अक्षराचे वडील कमल हासन यांच्या ‘एक दुजे के लिए’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.