‘Game Changer’ OTT Release Date: गेम चेंजर हा शंकर षण्मघम दिग्दर्शित एक राजकीय अॅक्शन चित्रपट आहे. राम चरण (Ram Charan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत असलेला 'गेम चेंजर' (Game Changer) 10 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाला थिएटरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता, बहुप्रतिक्षित हा चित्रपट डिजिटल रिलीजसाठी सज्ज झाला आहे. गेम चेंजर 7 फेब्रुवारीपासून प्राइम व्हिडिओवर (Prime Video) प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जरी थिएटरमध्ये प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली असली तर, ज्यांच्याकडे ओटीटी प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व आहे. ते हा चित्रपट ऑनलाइन पाहू शकतात. गेम चेंजरची निर्मिती दिल राजू यांनी श्री वेंकटेश्वर क्रिएशन्सच्या बॅनरखाली केली आहे. (Kannappa: 'कन्नप्पा'मधील प्रभासचा फर्स्ट लूक समोर; बहुप्रतिक्षित चित्रपट 25 एप्रिल ला होणार प्रदर्शित (See Poster))
'गेम चेंजर' आता प्राईम व्हिडिओवरही होतोय रिलीज
View this post on Instagram
अमेझॉन प्राइम व्हिडिओने राम चरणच्या 'गेम चेंजर'चे ओटीटी हक्क विकत घेतले आहेत. आता ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 'गेम चेंजर' चित्रपट 7 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होईल. त्याचबरोबर चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाला थिएटरमध्ये चांगली कमाई करता आलेली नाही. चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 51 कोटींची कमाई केली. त्यानंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस घट होत राहिली. अंदाजे 450 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 130.74 कोटी रुपये कमाऊ शकला. त्यामुळे आता चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेऊ शकेल की नाही? हे पहाव लागले.
शंकर दिग्दर्शित 'गेम चेंजर' हा कार्तिक सुब्बाराज यांनी लिहिलेला एक राजकीय थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात राम चरण, कियारा अडवाणी, नवीन चंद्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राम चरण एका आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.