राखी सावंत हिचा धक्कादायक खुलासा, अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी काम करतो म्हणे माझा नवरा
राखी सावंत आणि डोनाल्ड ट्रम्प (फोटो सौजन्य-Instagram)

बॉलिवूडमध्ये नेहमीच वादग्रस्त भाष्य करणारी राखी सावंत (Rakhi Swant)  ही सध्या सोशल मीडियात प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. कारण राखी हिने नुकतेच एका NRI व्यक्तीसोबत लग्न केल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियात राखी हिने लग्न झाल्याचे फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. तिचे हे लग्नाच्या लूकमधील फोटो पाहून नेटकऱ्यांकडून विविध तर्कवितर्क लावले जात आहे. राखी हिने तिच्या लग्नाबद्दल आता सांगूनच टाकले आहे.

मात्र राखी हिने केलेल्या व्यक्तीचा फोटो अद्याप लपवत असल्याचे दिसून येत आहे. ई-टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत राखी हिने असे म्हटले आहे की, माझा नवरा चक्क अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी काम करतो.(आयटम गर्ल राखी सावंतचे झाले अखेर शुभमंगल सावधान! पाहा कोणाशी झाले राखीचे स्वयंवर)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

माझ्या नवऱ्याला मीडियासारखी गोष्ट अजिबात आवडत नाही. त्याला कोणाच्या समोर यायचे नव्हते. लग्न तर दोन घरांमध्ये होते. यामध्ये थोडी जगाला बोलवायचे असते. रितेश आणि मी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल जेडब्लू मॅरियट येथे केले आहे. रितेश हा हिंदू एनआरआय असून मी ख्रिस्ती असल्याचे राखी हिने म्हटले आहे. तसेच लग्नात घरातील मोजकीच मंडळी उपस्थितीत होती. तसेच माझा नवरा हा ट्रम्प यांच्या एका कंपनीत नोकरी करत असल्याचा धक्कादायक खुलासा राखी हिने केला आहे.