PVR सिनेमागृहांची ग्राहकांसाठी शानदार ऑफर! फ्री तिकिटह पॉर्पकॉनची घेता येणार मजा, जाणून घ्या अधिक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

कोरोनाच्या काळात जर तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर ही तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण लॉकडाउनमुळे वर्क फ्रॉम होम सुरु असून लोकांचा घरीच थांबावे लागत आहे. अशातच आता तुमचा वेळ जाण्यासाठी तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. कारण सिनेमागृहांमध्ये जर तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी जाणार असाल तर तुम्हाला कोणत्याही पैशांशिवाय मनोरंजनाचा दुप्पटीने मजा घेता येणार आहे.(Indian Idol 12 मध्ये सहभागी होणार 'बचपन का प्यार' फेम सहदेव; पवनदीप सह परफॉर्म करण्याची शक्यता- Reports)

खरंतर PVR सिनेमा अशा लोकांसाठी शानदार ऑफर घेऊन आला आहे की, ज्यांनी कोरोनाच्या दोन्ही लसींचे डोस घेतलेले आहेत. पीव्हीआर अशा लोकांना फ्री मध्ये सिनेमांची तिकिट देत आहे. पीव्हीआरने या ऑफरचे नाव JAB असे ठेवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीव्हीआरने कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना ही ऑफर देत आहे. त्याचसोबत पॉपकॉर्न सुद्धा ग्राहकांना दिले जाणार आहेत. याचा लाभ येत्या 12 ऑगस्ट पर्यंत घेता येणार आहे. ही ऑफर तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पॉंडिचेरी राज्य सोडून अन्य सर्व सिनेमे आणि सिनेमागृहात लागू केली आहे. जेथे पीव्हीआर सुरु करण्याची परवानगी दिली आहे.(Tiger Shroff Upcoming Movie: टायगर श्रॉफ बनला जादूगर, जादूचा प्रयोग दाखवतानाचा त्याचा 'हा' व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

नव्या ग्राहकांसाठी ऑफर्स व्यतिरिक्त पीव्हीआर योजना आपल्या 1.1 कोटी पीव्हीआर प्रिविलेज ग्राहकांना तिकिट आणि खाण्याचा खर्च या दोन्हीसाठी दुप्पट मजा घेता येणार आहे. याचा कंपनीच्या लॉयल ग्राहकांना फायदा मिळणार आहे. सिनेमा पाहणाऱ्यांच्या दुसऱ्या तिकिटावर 150 रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. ऑफर लिमिटेड टाइमसाठी आहे. जर तुम्हाला फुकटात तिकिट हवी असेल तर तुम्हाला पीव्हीआरच्या अधिकृत वेबसाइट, मोबाईल अॅप आणि सिनेमागृहांव्यतिरिक्त BookMyShow वर सुद्धा आपली तिकिट बुक करता येणार आहे.