Pushpa Pushpa Song Promo:'पुष्पा 2' चे पहिले गाणे 'पुष्पा पुष्पा' 1 मे रोजी सकाळी होणार रिलीज, प्रोमो झाला रिलीज (पाहा व्हिडिओ)

Pushpa Pushpa Song Promo: पुष्पा: द राइज पार्ट 1 हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे, निर्मात्यांनी घोषणा केली आहे की, पुष्पा 2 चे पहिले गाणे 'पुष्पा पुष्पा' 1 मे 2024 रोजी सकाळी 11:07 वाजता रिलीज होईल. या घोषणेसोबतच चित्रपटाचा प्रोमोही रिलीज करण्यात आला आहे. अल्लू अर्जुनच्या दमदार स्टाइलची झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळते. प्रोमो पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की हे गाणे खूपच धमाकेदार असणार आहे. चाहत्यांना हा प्रोमो खूप आवडला आहे आणि ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

 'पुष्पा पुष्पा' गाण्याचा प्रोमो पहा:

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

उल्लेखनीय आहे की पुष्पा: द राइज पार्ट 1 हा 2021 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आणि अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'मधील 'मैं झुकेगा नहीं' या डायलॉगने बरीच लोकप्रियता  निर्माण केली. आता पुष्पा 2 भाग 1 प्रमाणे यशस्वी ठरतो का हे पाहणे बाकी आहे. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.