(Photo Credit - Youtube)

Pushpa Box office Collection: राउथ सिनेमा मधील स्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'पुष्पा: द राइज' 17 डिसेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. पण प्रदर्शित केल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच बॉक्स ऑफिसवर सिनेमाने 100 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा पार केला आहे. हा आकडा वर्ल्डवाइड आहे. हा सिनेमा सुकुमार द्वारे दिग्दर्शित करण्यात आला आहे.

पुष्पा: द राइज हा पॅन इंडियाचा सर्वाधिक मोठा प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जात आहे. सिनेमा पाच विविध भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. याची निर्मिती दोन भागात करण्यात आली आहे. सिनेमाची कथा आंध्र प्रदेशातील शेषचलम क्षेत्रातील लाल चंदन तस्करांच्या आयुष्यावर आधारित आहे.(दुबईच्या Burj Khalifa वर दिसली 83 चित्रपटाची झलक; Ranveer Singh ची छबी पाहून Deepika Padukone च्या डोळ्यात आनंदाश्रू Watch Video)

सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी धमाका करु शकतो. परंतु जर तो विदेशात सुद्धा प्रदर्शित केला पाहिजे. ट्रेड अॅनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी म्हटले की, तो मलेशिया, सिंगापुर, इंडोनेशिया, साउथ अफ्रिका आणि अन्य काही देशात प्रदर्शित केला जाणार नाही आहे. सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फदाह फासिल हे मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत. या सिनेमासाठी प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या गेल्या आहेत. तर याचा दुसरा भाग पुढील वर्षात सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.