‘Pushpa 2 – The Rule’ Box Office Collection Day 1: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) बहुप्रतिक्षित 'पुष्पा-2' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने पहिल्या दिवशी हिंदी भाषेत 72 कोटींची कमाई केली आहे. त्याचबरोबर जगभरात 282.91 कोटींची कमाई केली आहे. या कलेक्शनसह पुष्पा-2 (Pushpa 2 – The Rule)हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. 2021 मध्ये रिलीज झालेल्या पुष्पानेदेखील बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स केले आहेत.
सर्वात मोठी ओपनिंग असलेला भारतीय चित्रपट
अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट पुष्पा 2 ने चित्रपटसृष्टीतील अनेक मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. या चित्रपटाने ओपनिंग डे कलेक्शनच्या बाबतीत एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.('Pushpa 2' Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू; हैदराबाद पोलिसांनी Allu Arjun आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध दाखल केला गुन्हा)
राजामौलीचा आरआरआरने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ओपनिंगसह चित्रपटांमध्ये अव्वल होता. Secnilk च्या मते, या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 133 कोटींची ओपनिंग केली होती. मात्र, पुष्पा-2 ने पहिल्या दिवशी 175.1 कोटींची कमाई केली आहे.
शाहरुखच्या जवानचा रेकॉर्ड मोडला
'पुष्पा-2'ने शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा हिंदी व्हर्जनचा रेकॉर्डही मोडला आहे. जवानने पहिल्या दिवशी हिंदी पट्ट्यात सुमारे 65 कोटी रुपये कमावले होते, तर पुष्पा 2 ने 72 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Sacknilk नुसार, आगाऊ बुकिंगच्या पहिल्या 24 तासांत 'पुष्पा 2' ची 3 लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली. या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 10 कोटी रुपयांचे ॲडव्हान्स कलेक्शन केले होते. त्याच वेळी, ब्लॉक सीट्ससह हा आकडा सुमारे 12 कोटी रुपये होता. या चित्रपटाने प्री-सेल्समध्ये शाहरुख खानच्या पठाणला मागे टाकले होते. जानेवारी 2023 मध्ये पहिल्या दिवशी पठाण चित्रपटाची 2 लाखांपेक्षा कमी तिकिटे विकली गेली. पुष्पा-२ च्या आधी पठाण हा चित्रपट आगाऊ बुकिंगमध्ये आघाडीवर होता.
सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'पुष्पा-2' तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या 5 भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अल्लू अर्जुन पुन्हा एकदा या चित्रपटात पुष्पराजच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदान्नाही श्रीवल्लीच्या अवतारात दिसत आहे. चित्रपटाची कथा जबरदस्त आहे आणि क्लायमॅक्स आणखीनच प्रेक्षणीय आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे.