Firebrand: प्रियंका चोप्राची निर्मिती असलेला, Netflix चा पहिला मराठी सिनेमा आजपासून रसिकांच्या भेटीला
Firebrand (Photo Credits: Twitter)

Firebrand on Netflix : टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक यानंतर आता डिजिटल माध्यामातून रसिकांसाठी अनेक कार्यक्रम उपलब्ध आहेत. त्यामुळे वेबदुनियेमध्ये अभिनयासोबतच निर्मितीक्षेत्रातही अनेक नामवंत कलाकार उतरत आहेत. डिजिटल मिडियामध्ये दबदबा असणारं नेटफ्लिक्स आता मराठी भाषेमध्ये आलं आहे. आज (22 फेब्रुवारी) नेटफ्लिक्सवर प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) निर्मित पहिला मराठी सिनेमा 'फायरबॅन्ड' रीलिज करण्यात आला आहे. उषा जाधव या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. Firebrand Trailer: Netflix वर 22 फेब्रुवारीला रीलिज होणार Priyanka Chopra निर्मित पहिला मराठी सिनेमा, पहा दमदार ट्रेलरची खास झलक

 

प्रियंका चोप्रा, अमिताभ बच्चन यांच्या खास शुभेच्छा

फायरबॅन्ड हा नेटफ्लिक्सवर रीलिज होणारा पहिला मराठी सिनेमा आहे. त्यामुळे या चित्रपटाची निर्मिती करणार्‍या प्रियंकाने ट्विट करत हा माझ्यासाठी एक अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे. प्रियंका चोप्राने यापूर्वी  Ventilator या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे.

 

अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाची प्रमुख अभिनेत्री उषा जाधवला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अरुणा राजे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नेटफ्लिक्सच्या माध्यमातून हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार असल्याने एकाचवेळी जगभरातले अनेक मराठी सिनेमे चाहते या कलाकृतीचा आनंद घेऊ शकणार आहेत.महिलांच्या सबलीकरणावर भाष्य करणारा 'फायरब्रॅन्ड' या सिनेमामध्ये उषा जाधव, गिरीश कुलकर्णी, सचिन खेडेकर, राजेश्वरी सचदेव ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.