Pravin Tarde (Photo Credits: Instagram)

शेती विकायची नसते राखायची असते असा विचार चित्रपटातून मांडणाऱ्या अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarade) याने खऱ्या आयुष्यात सुद्धा अनेकांसमोर एक उदाहरण घालून देईल असे काम केले आहे. प्रवीण यांनी आपले वडील विठ्ठल तरडे यांच्या वाढदिवसाच्या निमित अलीकडे आपल्या मूळगावी कुटुंबासोबत भात लावणी करण्याचा बेत आखला होता. मुळशी (Mulshi) तालुक्यातील जातेडे या त्यांच्या गावात त्यांनी वडील विठ्ठल तरडे, आई रुक्मिणी, पत्नी स्नेहल, भाऊ योगेश तरडे आणि कुटुंबीयांसमवेत भातलावणी केली.यावेळचे काही फोटो सुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मराठी सिनेसृष्टीत आताच्या घडीला एक मोठं नाव असूनही आपल्या मातीशी जोडून राहिलेल्या या अभिनेत्याचं चाहत्यांतर्फे खुप कौतुक होत आहे. अनेकांनी त्याचे हे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. सरसेनापती हंबीरराव ग्रास आर्ट पाहून अभिनेता प्रविण तरडे भारावला, शेतकरी कलाकाराला दिला 'हा' शब्द; पहा त्याची फेसबूक पोस्ट

प्रवीण तरडे यांनी लोकसत्ता ला दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन काळात शेतीचे काम करायला मजूर मिळत नाहीयेत, दरवर्षी जुलै च्या आधी शेतीची काम उरकून आषाढी वारीला जाण्यासाठी आई वडील वडील तयार झालेले असतात, यंदा मात्र हा सगळाच प्लॅन फिस्कटल्याने आम्हीच सर्वांनी एकत्र शेतीचं काम करायचं ठरवलं.

प्रवीण तरडे फोटो

 

View this post on Instagram

 

मी शेतकरी 😍 . . . . @pravinvitthaltarde #pravintarde #atozmarathi

A post shared by AtoZMarathi.Com (@atozmarathiofficial) on

दरम्यान, प्रवीण तरडे यांचा येऊ घातलेला सिनेमा सरसेनापती हंबीरराव जून मध्ये प्रदर्शित व्हायचा होता मात्र लॉक डाऊन मुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सुद्धा पुढे ढकललेली आहे.